लोकसभेनंतर शिवसेना, राष्ट्रवादी लोप पावणार किंवा विलीनीकरण करतील, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा!

Prithviraj Chavan : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ), राष्ट्रवादीचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), काँग्रेस नेते, राहुल गांधी ( Rahul Gandhi ), शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झंझावती दौऱ्यांनी गाजलेल्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार रविवारी संपुष्टात आला. राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मंगळवारी (07 May) मतदान होणार असून, महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) आणि महायुतीची ( Mahayuti ) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.

Prithviraj Chavan


“लोकसभा निवडणुकीनंतर  सहा पक्षांमधील दोन पक्ष लोप पावतील. कुठेतरी विलीनीकरण होतील किंवा लोप पावतील, ” असा दावा पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

दोन पक्ष राहणार नाहीत

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील, सहा पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर सहामधील दोन पक्ष लोप लापतील. त्यांचं कुठेतरी विलीनीकरण होईल अथवा त्यातील लोकप्रतिनिधी इकडे-तिकडे पळतील. मात्र, दोन पक्ष राहणार नाहीत.”


मोदी यांची तारंबळ आणि भाषा सगळेजण पाहत आहेत

“लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) महाविकास आघाडीला बहुमत मिळेल. 48 पैकी 25-26 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आश्चर्याचा धक्का बसेल, असा निकाल लागणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. जीएसटी, बेरोजगारी हे जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. त्यामुळे मोदी नकोत, अशी सुप्त लाट आहे. मोदी यांची तारंबळ आणि भाषा सगळेजण पाहत आहेत. भाजपनं ‘400 पार’चा नारा दिला आहे. तर, काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चौकशी करण्याची गरज काय?” असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला विचारल आहे.

मोदी कामगिरी, आश्वासनांवर प्रश्नावर बोलत नाहीत

“नरेंद्र मोदी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. मोदी 10 वर्षातील कामगिरी, आश्वासन आणि जनतेच्या प्रश्नावर बोलत नाहीत. यातून काय निष्कर्ष काढायचा तो काढा. सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, माढा, बारामती शिरूर, नगर या जागा महाविकास आघाडी जिंकेल,” असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

By. Trupti S.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *