अखेर चार विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि भाजपच्या गोटात मोठा आनंदोत्सव पाहायला मिळाला. भाजप ने 4 पैकी 3 राज्यात खूप मोठ यश मिळवल तर कोन्ग्रेस ला फक्त तेलंगाना राज्यावर समाधान मानावे लागल. भाजपने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यां मध्ये कोन्ग्रेस चा अक्षरशः धुव्वा उडवला. या निवडणुका चुरशीच्या होण्याचे कारण म्हणजे या निवडणुकांनंतर लगेचच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभे आधी इतर कोणत्याही निवडणुका नाहीत त्यामुळे या निवडणुकांकडे सेमी फायनल म्हणून पाहिले जात होते.
त्यामुळे या राज्यांतील होणाऱ्या विधानसभा निवडणुकींचे निकाल हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाचे होते. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आणि तेलंगाना या राज्यांतील निकाल जाहीर झालेत आणि मिज़ोरम चे निकाल आज असणार आहेत. भाजपने या निवडणुकीत विजय मिळवला असला तरी या पाच राज्यातील निकालांचे काय परिणाम होतील ते सविस्तर जाणून घ्या.
जात सर्वेक्षणावर भर
संपूर्ण देशात जातीनिहाय सर्वेक्षणाची मागणी जोर धरत असताना विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने बिहारच्या धर्तीवर जात सर्वेक्षणाचा आदेश जारी केला होता. आणि तसेच आश्वासन काँग्रेस ने मध्य प्रदेशात देखील दिले होते. काँग्रेस समाजात फूट पाडत असल्याचा आरोप भाजप कडून केला गेला. त्यामुळे निवडणुकीचे निकाल काय लागतील यावरून जनतेचा कौल कोणत्या बाजूने असेल ते समजणार होते आणि त्याचा उपयोग लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवण्यासाठी होणार होता. पण जनतेने कोन्ग्रेस च्या या दाव्यावर जनतेने विश्वास दाखवला नाही त्यामुळे येणार्या निवडणुकीत हा मुद्दा दिसेल याबाबत साशंकता आहे.
इंडिया आघाडीतील काँग्रेसच भविष्य टांगणीला(Graphics)(21s)
देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीत काँग्रेसच भविष्य आणि भूमिका काय असेल हे या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल ठरणार होते. कोन्ग्रेस ने तेलंगाना वगळता इतर राज्यात अतिशय वाईट कामगिरी केली, राजस्थान आणि मध्य प्रदेशात तर सरकार देखील टिकवता आले नाहीये. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल आणि जागावाटप ठरवताना आघाडी मध्ये त्यांचा वाटा काय असेल ते पाहणे महत्त्वाचे असेल.
रेवडी संस्कृतीचे भविष्य ठरणार
राजकारणातील रेवडी संस्कृतीचे भविष्य ठरवण्यासाठी सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. कारण गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांपूर्वी अनेक सोयी मोफत देण्याच्या आश्वासनांवर आणि त्याभोवतीच्या राजकारणावर जोरदार चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी देखील यावर टीका केली होती. काँग्रेस आणि इतर पक्षांनी मतदारांना अनेक आश्वासने दिली. भाजपने याला विरोध केला असेल पण प्रत्येक निवडणुकीत जिथे त्यांचे सरकार होते तिथे ते देखील अशी आश्वासने करताना दिसले. पण मतदारांनी अशा मोफत मिळणार्या रेवडी ला पूर्णपणे नाकारले. त्यामुळे विरोधी पक्षांना आता अशा घोषणा करण्यापूर्वी विचार करावा लागेल .
मोदी मॅजिक यंदा चालले का?
भाजपने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या काम पुढे करून विधानसभा निवडणूक लढवली गेली. मध्यप्रदेशातील सध्याच्या सरकारवर जनतेचा रोष होता आणि ते कमी करण्यासाठी मोदींना पुढे केले गेले. पंतप्रधान मोदी वन मॅन आर्मीप्रमाणे या निवडणूकीत मैदानात उतरले. आणि त्यांच्यामुळे निवडणुका सोप्या गेल्या असे भाजप नेत्यांना वाटते, आणि यात गैर काहीच नाही कारण या वेळी भाजपने स्थानिक चेहरे पुढे न करता मोदींच्या चेहर्यावर निवडणुका लढल्या त्यामुळे मोदी मॅजिक यावेळी चाललेलं दिसून आले.
राहुल गांधींवर जनतेचा विश्वास
2014 आणि 2018 मध्ये पराभवाला सामोरे गेल्यावर 2024 च्या निवडणुकी मध्ये राहुल गांधी मोठा चेहरा म्हणून मोदींपुढे उभे ठाकतील असे कॉन्ग्रेस ला आणि इंडिया आघाडीला वाटत होते पण या निवडणुकीत कॉन्ग्रेस च्या कामगिरीने राहुल गांधी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह असेल.
भारत जोड़ो यात्रा अयशस्वी ठरली का?
गेल्या वर्षी राहुल गांधींच्या भारत जोड़ो यात्रेनंतर हिमाचल प्रदेश तसेच कर्नाटक मध्ये यश मिळाल्यामुळे कॉन्ग्रेस यात्रा यशस्वी झाल्याच कॉन्ग्रेस कडून बोलले जात होते. पण गुजरात, पंजाब आता राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मधील पराभवा नंतर यात्रेचा म्हणावा तितका फायदा कॉंग्रेस ला झाला नाही अस म्हणण्यात कोणाच्या मनात शंका नाहिये.
2024 लोकसभा निवडणुकांचा निकाल काय असेल?
आताच्या निकालावरून सध्या तरी भाजप खूप चांगल्या स्थितीत वाटते आणि मतदारांवर अजूनही नरेंद्र मोदींचा प्रभाव असल्याचे दिसते, त्यामुळे या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ला हरवायला कॉन्ग्रेस ला खूप जड जाईल अस दिसते. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वातच निवडणुका लढवेल आणि जिंकून देखील येऊ शकते.
या सगळया शक्यता सध्याच्या निकालावरून असल्या तरी 2024 लोकसभा निवडणुका अजून दूर आहेत त्यामुळे प्रत्येक पक्षाकडे अजून रणनीति ठरवायला बराच वेळ असेल पण या निवडणुकांचे निकाल देशाचे राजकीय भवितव्य काय असेल ते ठरण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत.