DeepFake AI । डीप फेक AI धोकादायक का आहे?

तंत्रज्ञानाच्या मदतीनं AI वापरून बनावट व्हिडिओ बनवले जातात जे पूर्णपणे खरे वाटतात, पण दिसत तस नसत अस म्हणतात. डीप फेक म्हणजे व्हिडीओ एका विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बनवून त्यात अश्लील क्लिपचा भाग मिक्स करून माॅर्फ केलेले असतात. पण ज्यांचे असे व्हिडीओ बनतात त्यांना असं वाटतं की, हा व्हिडीओ खराच आहे. आपला असा व्हिडीओ सोशल मीडियात किंवा मित्र परिवारांमध्ये व्हायरल झाला तर ते हा माॅर्फ केलेला व्हिडीओ खरा समजतील व आपल्याविषयी गैरसमज होईल, असं अनेकांना वाटतं. त्या भीतीपोटी, अब्रुनुकसान टाळण्यासाठी सायबर गुन्हेगारांच्या धमक्यांना बरेच जण बळी पडून लाखो रुपये देत बसतात.



लोकांसाठी डीपफेक तयार करणं खूप सोपं झालंय. कारण अनेक अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअर ते तयार करण्यात मदत करतात. व्हिडिओ खरा आहे की खोटा हे तपासताना चेहऱ्याकडे बारकाईनं लक्ष दिले तर लगेच समजते. डीपफेक AI प्रोग्रामिंगद्वारे एका व्यक्तीला दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीसारखे दिसण्यासाठी डिझाइन केल गेलंय. डीपफेकच्या मदतीने, डिजीटल मीडियामध्ये खोट्या गोष्टी सहजपणे मोठ्या प्रमाणावर पसरवल्या जाऊ शकतात, जे पूर्ण सत्य असल्यासारखं दिसून येते. डीपफेक टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ते कुठे वापरले जाते आणि ते टाळण्यासाठी उपाय काय आहे ते जाणून घ्या.

डीप फेक वीडियो कसा ओळखायचा.

खोल बनावट व्हिडिओ शोधणे ही एक अवघड गोष्ट आहे जे मोठमोठ्या तज्ञांना देखील योग्य साधनांशिवाय करता येत नाही पण, एमआयटी मधील संशोधकांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यामुळे सामान्य लोकांना खरा व्हिडिओ आणि बनावट वीडियो यांच्यातील फरक सांगण्यास मदत करतात. व्हिडिओ खरा आहे की खोटा हे तपासताना चेहऱ्याकडे बारकाईने पाहिल्यास लगेच समजते, कारण उच्च श्रेणीतील डीपफेक मॅनिप्युलेशनमध्ये जवळजवळ नेहमीच चेहर्‍यामध्ये छेड़छाड़ केलेली असते.

चेहऱ्या वरील गाल आणि कपाळ भागांकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज असते. त्वचा खूप गुळगुळीत किंवा खूप सुरकुत्या खूप सुरकुत्या पडलेली आहे का? त्वचेचे वय, केस आणि डोळ्यांचे वय सारखेच आहे का? त्याचप्रमाणे, डोळे आणि भुवया देखील नीट पहिल्या तर खर खोट समजून जाते. कारण संशोधकांच्या म्हणण्यानुसार, डीपफेक व्हिडिओंमधील सावल्या देखील तुम्हाला कधीकधी चुकीच्या ठिकाणी दिसतात. म्हणजे ज्या ठिकाणी असायला पाहिजे तिथे दिसत नाही.

ओठांचा आकार आणि डोळ्यांची उघडझाप

डीप फेक वीडियो मध्ये कल्ले नाहीतर दाढी जोडू किंवा काढू शकतात, परंतु ते सहसा चेहऱ्यावर पूर्णपणे नैसर्गिक केस बदलण्यात अपयशी ठरतात. चेहऱ्यावरील तीळांच्या बाबतीतही असेच होते, जे डीपफेक तंत्रज्ञान वापरून बनवले गेलेल्या वीडियो मध्ये सहसा नैसर्गिक किंवा वास्तविक वाटत नाही. ओठांचा आकार आणि रंग देखील व्हिडिओ खरा की खोटा ठरवू शकतात. डोळ्याच्या उघडझापीच्या दरावरुन आणि गतीवरुन देखील व्हिडिओ खरा आहे की खोटा हे कळू शकते.
डीप फेक तंत्रज्ञानाचे धोके
डीप फेक टेक्नॉलॉजीच्या मदतीने कुणाची बदनामी होऊ शकते. डीप फेकचा वापर करून विशेषतः महिला आणि मुलींना लक्ष्य केले जाते. कोणत्याही व्यक्तीचे त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून खाजगी फोटो घेऊन बनावट अश्लील व्हिडिओ बनवले जातात. कोणत्याही नेत्याचा किंवा प्रसिद्ध व्यक्तींचा एमएमएस करता येतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी कधीही न दिलेल्या भाषणांचे व्हिडिओ प्रसिद्ध करता येतात.

डीपफेक वीडियो केल्यास काय शिक्षा होईल?

जरा अशा प्रकारचे वीडियो बनवले किंवा तसे प्रकार करताना आढळले तर सरकारने त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आलीय. त्यानुसार IT कायदा २००० च्या कलम 66E अंतर्गत कोणाचेही फोटो आणि व्हिडिओ परवानगीशिवाय तयार केला तर ३ वर्षांचा तुरुंगवास आणि २ लाख रुपये चा दंड ही शिक्षा होऊ शकतो.
या नियमांचे उल्लंघन केल्यावर दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा नियम आहे. यामध्ये परवानगीशिवाय कुणाचा वैयक्तिक फोटो काढून शेअर केल्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाऊ शकते. इतकंच नाहीतर आयटी कायद्याच्या कलम ६७ अन्वये, सॉफ्टवेअर किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे एखाद्याचा अश्लील फोटो तयार करणे आणि शेअर केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपयांचा दंड आकारला जातो तर असं वारंवार केलं तर तुम्हाला ५ वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंड बसू शकतो. डीपफेक व्हिडिओ तयार केल्याचं उघड झाल्यास, आयपीसीच्या कलम 66C, 66E आणि ६७ अंतर्गत कारवाई केली जाते. यामध्ये आयपीसी कलम 153A आणि 295A अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाऊ शकते.
त्यामुळे अशा बनावट वीडियो पासून दूर रहा आणि बनावट वीडियो वर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि अशे वीडियो वायरल करू नका. कारण तशी वेळ तुमच्या कुटुंबावर येऊ शकते त्यामुळे सुरक्षित रहा आणि तुमच्या परिवारातील लोकांना सुरक्षित ठेवा. 

DeepFake AI । डीप फेक AI धोकादायक का आहे?


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *