SBI Clerk Prelims Admit Card 2023 : खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. जे परीक्षार्थी एसबीआई च्या क्लर्क पदाची परीक्षा देत आहेत ते परीक्षार्थी एसबीआई च्या वेबसाईटवर sbi.co.in वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
एसबीआई क्लर्क पूर्व परीक्षेचे आयोजन ५, ६, ११, आणि १२ जानेवारी पर्यंत केले जाणार आहे. ही परीक्षा तीन चरणात होणार असून पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची निवड जूनियर असोसिएट्स (Customer Supports And Sales) या पदावर तब्बल ८२८३ जागांवर होणार आहे.
हे ही वाचा : Sakshi Malik Quit Wrestling । साक्षी मलिकचं कुस्ती सोडणं WFI साठी धोक्याची घंटा का आहे?
असा असेल परीक्षेचा पॅटर्न
एसबीआई क्लर्क पूर्व परीक्षा ऑनलाइन स्वरुपात होणार आहे. ही परीक्षा १०० मार्कांमध्ये विभागली असून परीक्षेचे तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे ते पुढीलप्रमाणे,
इंग्रजी भाषा – ३० मार्क्स
संख्यात्मक क्षमता – ३५ मार्क्स
तर्क क्षमता – ३५ मार्क्स
प्रत्येक विभागातील परीक्षेसाठी ३० मिनिटांचा अवधी देण्यात येणार असून वस्तुनिष्ठ परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येक प्रश्नासाठी १/४ मार्क वजा केले जाणार आहेत.
अस काढता येईल प्रवेशपत्र (SBI Clerk Prelims Admit Card 2023 Process)
स्टेप क्रमांक १. एसबीआय (SBI) च्या अधिकृत संकेतस्थळाला (sbi.co.in) ला भेट द्या.
स्टेप क्रमांक २. मुखपृष्ठावर असलेल्या अॅडमिट कार्ड (Admit Card) या लिंकवर क्लिक करा.
स्टेप क्रमांक ३. आता आवश्यक ती माहिती भरून घ्या.
स्टेप क्रमांक ४. तुमच्या समोर तुमचे प्रवेश पत्र आले असेल ते डाउनलोड करुन घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
जे परीक्षार्थी एसबीआई क्लर्क पूर्व परीक्षा देणार आहेत त्यांनी पुढील काळजी घेतली पाहिजे. प्रवेशपत्र २६ डिसेंबर पासून १२ जानेवारी पर्यंत एसबीआई च्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. प्रवेशपत्रासोबत ओरिजिनल फोटो तसेच ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यांच्यातील एक कोणतेही)
सोबत बाळगले पाहिजे. परिक्षा केंद्रात प्रवेशपत्रासोबत ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे. जो विद्यार्थी वरील नियमांचे पालन करणार नाही त्यांना परीक्षेस बसता येणार नाही.