IND vs SA 1st Test : भारत वि. दक्षिण अफ्रीका मध्ये होत असलेल्या २ कसोटी सामन्यांमधला पहिला सामना सेंचुरियन मधील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका चा कर्णधार तेंब्वा बवुमा ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निर्णय घेतला. भारतासाठी प्रसिद्ध कृष्णा ने आणि दक्षिण आफ्रिका साठी नंद्रे बर्गर आणि डेविड बेडिंघम यांनी पदार्पण केले. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा सामना रद्द झाला असून भारताची धावसंख्या ८ बाद २०८ आहे. केएल राहुल सर्वाधिक नाबाद ७० धावांवर खेळत आहे.
पहिल्या दिवशी भारताचे प्रदर्शन खराब
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात काही खास नव्हती आणि कर्णधार रोहित पाच धावा करून रबाडाचा पहिला बळी ठरला. यानंतर यशस्वी जयस्वाल १७ धावा करून निघून गेला आणि शुभमन गिल दोन धावा करून निघून गेला. २४ धावांत तीन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले.
हे ही वाचा : SBI Clerk Prelims Admit Card 2023 । एसबीआई क्लर्क पदाच्या पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जारी.
विराट ३८ धावा करून बाद झाला तर श्रेयस ३१ धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विनने आठ आणि शार्दुल ठाकूरने २४ धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहही एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, केएल राहुल ७० धावांवर नाबाद खेळत आहे. त्याला मोहम्मद सिराज साथ देत आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी कगिसो रबाडाने सर्वाधिक ५ बळी घेतले तर नांद्रे बर्जरने दोन तर मार्को जॅनसेनने एक गडी बाद केला.
पावसामुळे निर्धारित असलेल्या ९० षटकांपैकी ५९ षटके टाकण्यात आली. याची भरपाई म्हणून सामन्याच्या दुसर्या दिवशी खेळ अर्धा तास आधी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी केएल राहुल झटपट धावा करत शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका झटपट दोन विकेट घेत भारताला छोट्या धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करेल.