प्रबळगडावर सेल्फी घेण्याचा नाद नडला; 24 वर्षीय नवविवाहित महिला दोन हजार फूट खोल दरीत कोसळली.

Accident News : माची प्रबळगडावर सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने 2 हजार फुट खाली दरीत कोसळून 24 वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. शुभांगी विनायक पटेल असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे,  ती 28 डिसेंबर ला पतीसोबत ट्रेकिंग ला गेलेली होती. त्यावेळी सेल्फी काढत असताना खाली पडून तिचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी पटेल आणि विनायक पटेल यांचे वीस दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणाहून ते दोघे दुपारच्या सुमारास (2 वाजता)  माची प्रबळ येथे ट्रेकिंग ला गेले होते. यावेळी  शुभांगी सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती वरून खाली पडली. हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यादेखत घडला.

हे ही वाचा : स्थापनेनंतर दोन दशके कॉंग्रेस ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ राहिले.

शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या महिलेला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि त्यांची शेडुंग चौकीचे कार्यरत पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांच्या,स्थानिकांच्या आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले होते. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केले.


आपल्या अनकट मराठी च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.🙏

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *