Dunki Box Office Collection : शाहरुख खान (Shahrukh khan) च्या डंकी (Dunki) सिनेमाची मोठी क्रेझ पहायला भेटत आहे. २१ डिसेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी ३० करोड चे कलेक्शन केले होते. अशातच आता १० व्या दिवसाचे Collection (Dunki Day 10 Box Office Collection) समोर आले आहे.
![]() |
Dunki Box Office Collection Day 10 |
चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस उलटले आहेत. त्याच वेळी, त्याचे १० दिवसांचे कलेक्शन देखील समोर आले आहे. Sachnilk च्या रिपोर्टनुसार, डंकीने (Dunki) ने १० व्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई केली आहे. यानंतर त्याची भारतातील एकूण कमाई आता १७६.४७ झाली आहे. जर आपण चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोललो, तर त्याने ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि भारतातील ३०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे.
४०० कोटींपासून किती दूर?
अशा परिस्थितीत हा चित्रपट लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचेल अशी आशा केली जात आहे. आज नववर्षाचे आगमन आणि रविवार संध्याकाळ, त्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. प्रभासच्या ‘सालार’ (Salaar) चा प्रभाव डंकी च्या कमाईवरही पाहायला मिळत आहे. सालारचे जगभरातील कलेक्शन ४०० कोटींच्या पुढे गेले आहे. या वर्षी शाहरुख खानचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, जवान (JAWAAN) आणि पठाणसोबत (PATHAN) त्याने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले, हे पाहणे महत्वाचे ठरेल की, आता शाहरुखचा डिंकी जवान आणि पठाणचे रेकॉर्ड मोडू शकेल का?
Yeh Dunki jaha se shuru huyi thi…
Hum bhi wahin se karenge start…
Ab aa bhi jaao Cinemas mein…
Our rollercoaster ride is ready to depart!Book your tickets! https://t.co/va0QwZtXml#Dunki In Cinemas Now. pic.twitter.com/PGkvUA4IUV
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 21, 2023
पठाणने ५५ कोटींची कमाई केली होती
शाहरुख खानच्या पठाणने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office) ५५ कोटींची कमाई केली होती, तर जवानने ५५ कोटींची कमाई केली होती. रिपोर्ट्सनुसार, जवानाने पठाणला १००० कोटींचा टप्पा ओलांडून मागे टाकले होते आणि एकूण १०५५ कोटी रुपये कमावले होते. यासह, जगभरातील बॉक्स ऑफिसवर पठाणचा १०५० कोटी रुपयांचा विक्रम मोडण्यात यश आले. आता बघू शाहरुखच्या डंकीचे कलेक्शन कुठपर्यंत पोहोचते.