Protest News : राज्यातील रेशन दुकानदारांनी पुकारला देशव्यापी बेमुदत संप

Protest News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांकडून संप पुकारून विविध गोष्टींची मागणी केली आहे. अशातच आता नववर्षाच्या (New Year 2024) पहिल्या दिवसापासूनच म्हणजेच उद्यापासून (1 जानेवारी 2024) राज्यातील रेशन दुकानदारांनी (स्वस्त धान्य दुकान) संप पुकारला आहे.

Image Source : Zee News

उद्यापासून सुरू होणारा हा संप बेमुदत संप असणार असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनकडून हा संप पुकारण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील या संपात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा : अमित शहांनी केले नवीन फौजदारी कायद्यांवरील संदर्भ पुस्तकांचे प्रकाशन ; पहा पूर्ण बातमी

पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील मिळून रेशन दुकानदारांची संख्या ही 53 हजार आहे. आजही या रास्त दुकानदारांच्या विविध मागण्या या प्रलंबित आहे. याच प्रलंबित न्याय हक्क मागण्यांच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले आहे. तर आजपर्यंत काढलेल्या मोर्चांची आणि आंदोलनांची देखील सरकारकडून दखल घेण्यात आलेली नाही. तर, महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आल्याचेही महासंघाकडून सांगण्यात आले आहे. तर सरकारकडून अद्यापही या मांगण्यांच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

हे ही वाचा : Dunki Box Office Collection : डंकीचे १० व्या दिवशीचे आकडे आले समोर ; कमावले इतके कोटी?

सरकारने रास्त भाव दुकानदारांच्याबाबतीत उदासीनता दाखवल्याने आता महासंघाच्यावतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने उद्या 01 जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये आता अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे. ज्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच रेशन दुकानदार हे संपावर जाणार आहे. रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50 हजार करा, 2जी ऐवजी 4जी मशीन द्या, कालबाह्य नियम बदला आणि आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा या मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांच्याकडून देण्यात आली आहे.


आपल्या अनकट मराठी च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *