David Warner Retirement : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सोमवारी कसोटी क्रिकेटसह एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानविरुद्धची शेवटची कसोटी खेळणाऱ्या वॉर्नरने सांगितले आहे की, 50 षटकांच्या फॉरमॅटमधूनही तो निवृत्ती घेत आहे पण गरज पडल्यास तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असेल.
37 वर्षीय खेळाडूने खुलासा केला की एकदिवसीय विश्वचषक फायनल हा त्याचा फॉरमॅटमधील शेवटचा सामना होता.
“मी निश्चितपणे एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत आहे. विश्वचषकाच्या माध्यमातून मी हेच सांगितले होते, भारतात विजय मिळवणे, ही एक मोठी उपलब्धी आहे,” असे वॉर्नर सोमवारी SCG जिथे तो शेवटची कसोटी खेळणार आहे तिथे बोलताना म्हणाला.
वॉर्नर पुढे म्हणाला की तो जगभरातील लीग क्रिकेट खेळण्याचा विचार करेल आणि पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी तो उपलब्ध आहे. गरज पडल्यास 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो उपलब्ध असेल असेही 37 वर्षीय खेळाडूने सांगितले.
त्यामुळे मी आज त्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेत आहे, ज्यामुळे मला जगभरातील काही लीग खेळता येतील आणि एकदिवसीय संघाला थोडं पुढे जाण्याची संधी मिळेल. मला माहित आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे. जर मी दोन वर्षांच्या कालावधीत उत्कृष्ट क्रिकेट खेळत असेल आणि मी आजूबाजूला असेल आणि त्यांना एखाद्याची गरज असेल तर मी उपलब्ध असेल, असं तो पुढे म्हणाला.
वॉर्नर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत त्याच्या घरच्या सिडनीमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात दिसणार आहे. त्यानंतर तो सिडनी थंडरसाठी बिग बॅश लीगमधील किमान चार सामने खेळेल परंतु IPL फ्रँचायझींद्वारे बँकरोल केलेल्या ILT20 लीग मध्ये दुबई कॅपिटल्ससाठी खेळण्यासाठी तो फायनल सामन्याला मुकु शकतो. स्टार सलामीवीर यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ना हरकत प्रमाणपत्र मागत आहे.
वॉर्नरची एकदिवसीय कारकीर्द गाजली
वॉर्नरने त्याच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये 2015 आणि 2023 मध्ये दोन 50 षटकांच्या विश्वचषकांसह एकदिवसीय कारकिर्दीचा शेवट केला. ऑस्ट्रेलियासाठी 6932 धावांसह या फॉर्मेटमध्ये तो सहाव्या क्रमांकावर आहे. केवळ रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, मार्क वॉ, मायकेल क्लार्क आणि स्टीव्ह वॉ यांच्याच फॉरमॅटमध्ये वॉर्नरपेक्षा जास्त धावा आहेत. सलामीवीर म्हणून, वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा ६८८८ धावा करणारा खेळाडू आहे, तो अॅडम गिलख्रिस्टच्या ९२०० धावांच्या मागे आहे. वॉर्नरने जानेवारी 2009 मध्ये 50 षटकांमध्ये पदार्पण केले आणि तो संघासाठी 161 एकदिवसीय सामने खेळला.