Redmi Note 13 5G Series : Redmi नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात भारतात आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी Redmi Note 13 5G सीरीजमध्ये तीन नवीन हँडसेट लॉन्च करणार आहे.
![]() |
Image Source : 3DNews |
रेडमी कंपनी Redmi Note 13 5G, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro Plus असे तीन व्हर्जन (Version) लॉन्च करणार आहे. या नवीन रेडमी फोन्सच्या त्या फीचर्सबद्दल सर्व काही एका क्लिकवर पहा जे कंपनी ने क्लेम केले आहेत.
Redmi Note 13 5G Series Specifications :
Redmi Note 13 5G Series Display
कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये असे दिसत आहे की Redmi Note 13 5G सीरीजमध्ये खूप कमी बेझल्स असतील. हँडसेटमध्ये AMOLED डिस्प्ले असेल ज्याचा रिफ्रेश दर 120 Hz असेल. स्क्रीन संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण उपलब्ध असणार आहे.
Redmi Note 13 5G Series Design And Colour
Redmi ने जारी केलेल्या टीझर मध्ये की Note 13 Pro आणि Note 13 Pro+ मॉडेल्स पेस्टल शेड्समध्ये उपलब्ध केले जातील. कंपनी हा हँडसेट पर्पल कलर वेरिएंटमध्येही लॉन्च करू शकते. याशिवाय हे फोन स्लिम डिझाइनसह सादर केले जातील. फोनची जाडी 7.6mm आणि वजन 173.5 ग्रॅम आहे. Redmi Note 13 5G स्मार्टफोन आर्क्टिक व्हाईट कलर वेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Redmi Note 13 5G Series Camera And Battery
Redmi Note 13 5G स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देखील आहेत. रिपोर्ट्सनुसार, डिवाइस मध्ये Android 13 आधारित MIUI 14 उपलब्ध असेल. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळू शकते. डिव्हाइसला उर्जा देण्यासाठी, 33W जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. कंपनीने पुष्टी केली आहे की फोनमध्ये Mi टर्बो-चार्ज तंत्रज्ञान (Turbo-Charge Technology) असेल, जे फोन फक्त 33 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज करेल.
हे ही वाचा : GATE 2024 Admit Card : IISc आज GATE 2024 साठी प्रवेश पत्र जारी करणार ; इथून करा डाऊनलोड
Redmi Note 13 5G Series Processor
Redmi Note 13 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimension 6080 प्रोसेसर दिला जाईल. तर Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ Qualcomm Snapdragon 7s Gen 2 चिपसेट सह लॉन्च केले जाऊ शकतात.
Redmi Note 13 5G Series Price Range
6GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB अशा प्रकारचे तीन व्हेरियंट लॉन्च केले जाणार आहेत. 8GB + 256GB व्हेरियंटची किंमत 22,999 रुपये आहे. तर 12GB + 512GB व्हेरियंटची किंमत 37,999 रुपये आहे. 6GB + 128GB या व्हेरियंटची किंमत अजून समोर आलेली नाहिये.