Rishabh Pant Sister Marriage : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant)सोशल मीडियावर कमालीचा ऐक्टिव असतो, ऋषभ पंत त्याच्या कुटुंबाच्या एका खाजगी कार्यक्रमात खूप आनंदी दिसत आहे. हा सोहळा पंतची बहीण साक्षी Rishabh Pant Sister Sakshi) हिच्या लग्नाचा आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर बहिणीच्या लग्न समारंभातील काही फोटो शेअर केले. पंत पांढर्या अंडरशर्टसह काळा कोट आणि पँट या अप्रतिम आउटफिटमध्ये दिसून आला.
तसेच, तिच्या होणार्या नवर्याने म्हणजेच अंकित ने पीच रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. या सोहळ्यातील फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. याशिवाय पंत त्याच्या आईसोबत डान्स करताना दिसत आहे, ज्यामध्ये पंत खूप आनंदी दिसत आहेत.
पंतने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये त्याची बहीण आणि त्याच्या आईचाही समावेश आहे. ऋषभ पंतने फोटोंना “Congratulations Sis❤️❤️❤️” असे कॅप्शन दिले आहे. पंत आयपीएल 2024 (IPL 2024) च्या मोसमात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.