Maldives President Mohammed Muizzu : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष (Maldives President) मोहम्मद मुइझ्झू (Mohammed Muizzu) यांनी मंगळवारी चीनला (China) आपल्या देशात अधिक पर्यटक पाठवण्याचे प्रयत्न आणखी तीव्र करण्याचे आवाहन केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या विरोधात त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून भारतीय पर्यटकांनी (Indian Tourists) आपली विमान तिकिटे रद्द केली बरोबरच बॉयकॉट मालदीव (Boycott maldive) असा ट्रेंड सुरू केला त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
![]() |
Mohammed Muizzu |
आपल्या पाच दिवसांच्या चीन दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुइझू यांनी मंगळवारी फुजियान प्रांतातील मालदीव बिझनेस फोरमला (Business Forum) संबोधित करताना चीन हा मालदीव राष्ट्राचा “जवळचा” मित्र असल्याचे म्हटले.
ते म्हणाले, “चीन हा आपला सर्वात जवळचा मित्र आणि विकासाचा भागीदार आहे.
त्यांनी 2014 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुरू केलेल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (Belt And Road Initiative) प्रकल्पांचे कौतुक केले आणि त्यांच्या भाषणानुसार त्यांनी “मालदीवच्या इतिहासात पाहिलेले सर्वात महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प वितरित केले” असे म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी चीनी सरकारला (China Government) आणि चीनी नागरिकांना त्यांनी चीनला मालदीवमध्ये पर्यटकांचा ओघ वाढवण्याचे आवाहन केले.
आपल्या अनकट मराठी च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या सोशल मीडिया अकाऊंट ला फॉलो करा.
Youtube – https://youtube.com/@UnCut-Marathi
Instagram – https://instagram.com/uncut_marathi
X (Twitter) – https://x.com/UnCut_Marathi
Web Portal – https://www.uncutmarathi.in