Bharat Nyay Yatra : मणिपूर सरकारने (Manipur Government) बुधवारी इंफाळ पूर्व (Imphal East) जिल्ह्यातील हट्टा कांगजेबुंग (Hatta Kangjeibung) येथे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत न्याय यात्रे’ (Bharat Nyay Yatra) साठी इंफाळ मधून यात्रा काढण्यासाठी परवानगी नाकारली. ही यात्रा १४ जानेवारीला (14 January) इंफाळ (Imphal) येथून सुरू होणार होती.
![]() |
Rahul Gandhi |
मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार के मेघचंद्र (K.Meghchandra) यांनी बुधवारी सकाळी पक्षाच्या नेत्यांच्या टीमसह मुख्यमंत्री एन बीरेन सिंग (N. biren Singh) यांची त्यांच्या कार्यालयीन संकुलात भेट घेतली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की त्यांचे सरकार हे करू शकत नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत परवानगी देऊ शकत नाही.
तरीही सरकारच्या या निर्णयाला”अत्यंत दुर्दैवी” म्हणून संबोधणारे मेघचंद्र म्हणाले की, परवानगी नाकारल्याने त्यांनी थौबल (Thoubal) जिल्ह्यातील खोंगजोम (Khongjom) येथून यात्रा सुरू करणार आहेत.
काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. रॅलीत पायी पदयात्रा आणि बसफेरी होणार आहेत.