Kumbh Mela : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी महाकुंभाच्या (Maha Kumbh Mela) निमित्ताने आज प्रयागराज (Prayagraj) येथील त्रिवेणी संगम (Triveni Sangam) येथे पवित्र स्नान करून विधीवत पूजा अर्चा केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उपस्थित होते.
गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांच्या संगमस्थळी राष्ट्रपतींनी गंगाजल अर्पण करून देशवासीयांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांनी सहभाग घेतला आहे.

महाकुंभ 2025 (Maha Kumbhmela 2025) ची सुरुवात 13 जानेवारीला पौष पौर्णिमेला झाली असून, 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीला त्याची सांगता होणार आहे. कुंभमेळ्यातील प्रमुख स्नानांपैकी माघी पौर्णिमा, बसंत पंचमी आणि महाशिवरात्री हे विशेष महत्वाचे मानले जातात.