India Vs Afganistan T20I : अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. जिथे संघाला तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. आज मोहालीच्या मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात मालिकेतील पहिला सामना खेळला गेला.
![]() |
IND VS AFG First T20I |
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने या सामन्यात (IND vs AFG) 20 षटकात 5 गडी गमावून 158 धावा करण्यात यश मिळवले. तर 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने चांगली फलंदाजी करत हा सामना 6 विकेटने जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत बनवल्या 158 धावा
मोहालीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात (IND vs AFG) अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 158 धावा केल्या. अफगाणिस्तान संघातर्फे सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज (Rehmanullah Gurbaj) आणि कर्णधार इब्राहिम झद्रान (Ibrahim Jadran) यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. त्यानंतर अवघ्या 7 धावांत संघाने सलग 3 विकेट गमावल्या. मात्र अष्टपैलू मोहम्मद नबीने (Mohammed Nabi) 27 चेंडूत 42 धावांची शानदार खेळी केली.
नबीने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय नजीबुलने 11 चेंडूत 19 धावा केल्या. अफगाणिस्तान संघासाठी यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने 23 धावा केल्या. तर कर्णधार इब्राहिम झद्रानने 25 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानच्या डावात एकूण 14 चौकार आणि 6 षटकार होते. त्याचवेळी टीम इंडियाकडून मुकेश कुमार (Mukesh Kumar) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) यांनी 2-2 विकेट्स घेण्यात यश मिळवले.
हे ही वाचा : India And Maldives Conflict । भारत आणि मालदीव वादाला सुरुवात कधी झाली? पहा संपूर्ण गोष्ट
भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला
अफगाणिस्तानने दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने या सामन्यात (IND vs AFG) शानदार फलंदाजी करत हा सामना 6 गडी राखून जिंकला. टीम इंडियासाठी अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने (Shivam Dube) उत्कृष्ट खेळी केली आणि ६० धावा करत नाबाद राहिला. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मानेही 20 चेंडूत 31 धावा केल्या. तर शुभमन गिल 23 आणि टिलक वर्मा 26 धावा करण्यात यशस्वी झाला. टीम इंडियाच्या इनिंगमध्ये एकूण 19 चौकार आणि 3 षटकार मारले गेले.