Ajit Pawar

महायुतीमध्ये धुसफूस सुरूच? एकनाथ शिंदेंना डावलून Ajit Pawar यांना दिली मोठी संधी

Ajit Pawar । राज्यात सध्या महायुतीची सत्ता आहे. परंतु, अनेकदा महायुतीमधील नेत्यांमध्ये अंतर्गत कलह असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यांच्या नाराजीत आता आणखी भर पडली असल्याचे बोलले जात आहे.

कारण, एकनाथ शिंदे यांना डावलून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. एकनाथ शिंदेंकडे नगर विकास आणि गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे फक्त एकाच अर्थमंत्र्यांची या प्राधिकरणावर निवड केली जाते. पण राज्य सरकारने ही जबाबदारी अजित पवारांना दिली आहे. शिंदेंना ही जबाबदारी मिळेल असे वाटत असताना नकळत त्यांना डावललं गेल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये राज्याचे मुख्य सचिव हे मुख्य कार्यकारी अधिकारी असून सदस्यांमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (ChandrashekharBawankule), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील (Makrand Jadhav-Patil) (NCP) आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांचा समावेश आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *