Delhi Election 2025 । माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे चौथ्यांदा सत्तेत येण्याचे स्वप्न भंगलं आहे. कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये (Delhi Election 2025) केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. या पराभवाची कारणे आता समोर आली आहेत.
अस्थिर नेतृत्व
मागील वर्षी अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यामुळे आम आदमी पक्षाचं नेतृत्व अस्थिर झाले. मुख्यमंत्रिपदी आतिशी यांची नियुक्ती होऊनही नेतृत्वाबाबतची अनिश्चितता संपली नाही.
भ्रष्टाचाराचा आरोप
मागील पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये या अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्यावर भ्रष्टाचाराचे खूप आरोप झाले. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आणि पक्षाला निवडणुकीत मोठा फटका बसला.
अंतर्कलह आणि राजीनामे
आम आदमी पक्षात अंतर्कलह आणि त्यातुन प्रमुख नेत्यांनी दिलेले राजीनामे आपच्या या पराभवाचं एक कारण मानले जात आहे.
विरोधी पक्षांचे आरोप
निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. फ्रीबिजच्या घोषणेचा पक्षाला फायदा झाला नाही.
काँग्रेसचा विरोध
काँग्रेसने (Congress) आम आदमी पक्षाची मते मोठ्या प्रमाणावर फोडल्याने अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला. जर या निवडणुकीत काँग्रेस आणि आपने युती केली असती तर भाजपचा पराभव झाला असता.