Delhi Elections 2025 : आज दिल्लीतील एकूण 70 जागांसाठी निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपकडून काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यावरून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (Umar Abdullah) यांनी काँग्रेस आणि आपवर निशाणा साधला आहे.
उमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर ‘महाभारत’ मालिकेतील एक सीन शेअर केला आहे. त्यात त्यांनी केवळ “और लडो आपस में!” एवढेच लिहिले आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालावर ही पोस्ट केली असल्याचे स्पष्ट होत आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपने एकत्र न लढल्याने त्याचा परिणाम आता पाहायला मिळत आहे.
Aur lado aapas mein!!! https://t.co/f3wbM1DYxk pic.twitter.com/8Yu9WK4k0c
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 8, 2025
महत्त्वाची बाब म्हणजे मागील दिल्लीमध्ये 27 वर्षांपासून भाजपला सत्ता मिळाली नव्हती. अशातच आता आता भाजपा 45 तर आप 25 जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीत काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून उमर अब्दुला यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनत आहे.