Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे, कारण विधानसभा अध्यक्ष
राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification) प्रकरणावर निकाल जाहीर केला होता. त्या निकालावर आक्षेप घेत ठाकरे गट (Thackrey Group) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेले होते. त्या
प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्या सर्व 40 आमदारांना नोटीस जारी केली. सुप्रीम कोर्टाने सर्व आमदारांना आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेणार आहे. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पाठवायचे किंवा हायकोर्टातील प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यायचे यावर निर्णय होईल.
![]() |
Supreme Court |
राहुल नार्वेकर यांनी काय निकाल दिला?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला होता. त्यांनी आपल्या निकालात सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवले होते त्यापेक्षा काही वेगळी निदर्शने नोंदवली. सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. पण विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचं ठरवलं आहे. गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती ही कायमस्वरुपी बेकायदा म्हणता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना स्पष्ट केलं. तसेच व्हीप हा भरत गोगावले यांचाच लागू होईल, असं म्हटलं. पण तरीदेखील भरत गोगावले यांच्याकडून पाठवण्यात आलेला व्हीप हा योग्य पद्धतीने आमदारांपर्यंत पोहोचला नाही म्हणून त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केले नाही. तसेच त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना देखील अपात्र ठरवलं नाही. राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल जाहीर करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली.
हे ही वाचा : Ram Mandir Inauguration : प्रभु श्रीराम मंदिर उभं राहिलं पण इतिहास माहित आहे का?
सुप्रीम कोर्टाच्या निकाल काय येणार?
विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर शिंदे गटाने (Shinde Group) देखील मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करावं, अशा मागणीसाठी शिंदे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने याबाबतचा निकाल घ्यावा, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता याप्रकरणी सुप्रीम कोर्ट दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून काय निकाल देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
By. Trupti S.