Imran Khan Case Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना दोन दिवसांत दुसरा मोठा धक्का बसला आहे. तोशाखाना प्रकरणी न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी (Bushra Bibi) यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने दोघांनाही 10 वर्षांसाठी कोणत्याही सार्वजनिक पदावर राहण्यास मनाई केली आहे. न्यायालयाने त्यांना 78.7 कोटी रुपयांचा सामूहिक दंडही ठोठावला आहे. मात्र बुशरा बीबी आज न्यायालयात हजर राहिल्या नाहीत.
![]() |
Imran Khan With Bushra Bibi |
पाकिस्तानमध्ये आठ दिवसांनी म्हणजेच ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असताना न्यायालयाचा हा निर्णय आला आहे. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ निवडणूक आयोगाच्या कठोर कारवाईमुळे कोणत्याही निवडणूक चिन्हाशिवाय निवडणूक लढवत आहे.
काल, गोपनीयता कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी ही शिक्षा सुनावली. इम्रान खान याच तुरुंगात बंद आहे. इम्रान खानला सुनावण्यात आलेली दोन्ही शिक्षा एकत्र चालणार की स्वतंत्रपणे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी युरोपसह, अरब देशांना भेटी दिल्या, तेव्हा तेथील राष्ट्राध्यक्षांनी त्यांना महागड्या भेटवस्तू दिल्या, ज्या इम्रानने तोशाखान्यात जमा केल्या, पण नंतर त्यांनी त्या भेटवस्तू स्वस्त दरात विकल्या, असा आरोप आहे. माजी पंतप्रधानांनी सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाला सांगितले होते की, या भेटवस्तू तोषखान्यातून 2.15 कोटी रुपयांना खरेदी केल्या होत्या आणि त्या विकून त्यांना सुमारे 5.8 कोटी रुपयांचा फायदा झाला.
By. UnCut मराठी Team