TBMAUJ Box Office Collection : शाहिद कपूर आणि क्रिती सेनाॅन चा चित्रपट पहिल्या आठवड्यात अर्धशतकापार

TBMAUJ Box Office Collection : शाहिद कपूर आणि क्रिती सेनाॅन चा चित्रपट पहिल्या आठवड्यात अर्धशतकापार

TBMAUJ Box Office Collection : शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) यांच्या ‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’ (TBMAUJ) या चित्रपटाने आश्चर्यकारक व्यवसाय केला आहे. रिलीजच्या अवघ्या आठवडाभरात चित्रपटाने अर्धशतक गाठले आहे. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ बॉक्स ऑफिसवर जोरात सुरू आहे. कोणत्याही सुट्ट्या नसतानाही या चित्रपटाने उत्कृष्ट व्यवसाय केला आहे.

‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’

‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ हा एक Sci-Fi चित्रपट आहे, पण त्यात रोमान्स आणि कॉमेडीचा स्पर्श आहे. रिलीजपूर्वी चित्रपटाच्या चांगल्या व्यवसायाची अपेक्षा फारशी कमी होती, कारण ऍ़डवान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने फक्त चांगली कमाई केली होती. मात्र, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ने अवघ्या आठवडाभरात सर्व गणितेच बदलून टाकली आहेत.

व्हॅलेंटाईन डे ला चांदी

‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’च्या व्यवसायाला व्हॅलेंटाईन वीकचा खूप फायदा झाला. यासोबतच वीकेंडनंतरही चित्रपटाचा व्यवसाय वाढतच गेला. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी (TBMAUJ Box Office Collection) ६.७० कोटींची कमाई केली. दुस-या दिवशी 9.65 कोटी, तर तिसऱ्या दिवशी 10.75 कोटींचा व्यवसाय झाला.

कमाईचे आकडे वाढले

‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ने ओपनिंग वीकेंडला २७ कोटी रुपयांची कमाई केली. त्याचवेळी सोमवारी हे कमाईचे आकडे थोडे अधिकच बिघडल्याचे दिसत होते. या चित्रपटाने पहिल्या सोमवारी केवळ 3.65 कोटींची कमाई केली. मंगळवारीही व्यवसाय फक्त 3.85 राहिला, मात्र बुधवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डेला ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ ने जवळपास 6.75 कोटींची कमाई केली.

पहिल्याच आठवड्यात विक्रम रचले

14 फेब्रुवारीला व्यवसायात तेजी आली आणि ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ची चांदी झाली. त्याचवेळी पुन्हा एकदा कलेक्शनमध्ये घसरण दिसून आली. तरीही पहिल्या आठवड्यात ‘तेरी बात में ऐसा उल्झा जिया’चा व्यवसाय उत्कृष्ट म्हणता येईल. Sacnilk च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने सातव्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला 3.25 कोटी कमावले. यासह, रिलीजच्या 7 दिवसांत, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 44.60 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे.

अर्धशतकाकडे चित्रपटाची वाटचाल

‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ आता ५० कोटींकडे वाटचाल करत आहे. बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या चित्रपटाचा वेग पाहता येत्या वीकेंडमध्ये हा चित्रपट अर्धशतक पूर्ण करेल असे वाटत आहे.

By. Trupti S.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *