तुम्हाला माहीत असेल नुकताच देशात CAA कायदा लागू झाला, आता CAA म्हणजे काय तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा पण तुम्ही म्हणाल की नागरिकता देणारा कायदा लोकांना भीतिदायक का वाटतो. या मध्ये अस काय आहे की ज्यामुले लोकांच्या मनात या कायद्याची भीती बसलीये. खर तर CAA ला घाबरण्याचे काहीच कारण नाही. पण त्यातील धोके सुद्धा खूप आहेत. ते समजून घेणे पण खूप महत्वाचे आहे. लोकांना या कायद्याबद्दल बर्यापैकी महितीच नाहीये जे आहेत ते गैरसमज आणि अफवा आहेत. CAA तोपर्यंत धोकादायक नाही जोपर्यंत NRC नावाचा कायदा लागू होत नाही. आता NRC म्हणजे काय आणि त्याचा CAA शी काय संबंध आहे, आणि यातून लोकांची नागरिकता कशी जाणार, कुणाला नागरिकता भेटणार आणि यातून कोणते वाद निर्माण झाले आहेत.
CAA च्या विरोधात देशभर आंदोलन
CAA विरोधात सध्या ईशान्य भारतात विशेष करून आसाम मध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन पेटलय आणि CAA चा विरोध केला जातोय शिवाय भारतात इतर भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध होतोय त्यासाठी CAA कायदा काय आहे ते बघणे गरजेच आहे तर CAA कायदा हा नागरिकता देणारा कायदा आहे आता कोणाला देणारा आहे तर ३१ ऑक्टोबर २०१४ च्या आधी भारतात अफगानिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातुन आलेल्या गैर मुस्लिम लोकांना म्हणजेच हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी या लोकांना बेकायदेशिररित्या आलेल्यांना भारत नागरिकत्व देणार असा या कायद्याचा थोडक्यात अर्थ आहे. आता तुम्ही म्हणाल की हा कायदा तर लोकांना नागरिकता देतो पण यातून लोक घाबरलेल्या अवस्थेत का आहेत तर त्याला कारण आहे.
नागरिकता कशी जाणार?
CAA नंतर लागू होणारा NRC हा कायदा. मित्रांनो हा कायदा समजून घेणं खूप महत्वाचे आहे कारण सगळी Chronology या NRC भोवती फिरते. कारण नागरिकता CAA कायद्याने नाही जाणार तर ती जाणार आहे NRC या कायद्यामुळे जाणार आहे. ती कशी तर NRC म्हणजे नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझन्स, म्हणजेच भारतीय नागरिकांची नोंदवही. 2003च्या कायद्यानुसार ही नोंदवही सर्व भारतीय नागरिकांसाठी आहे. मात्र 2019 मध्ये आसाममध्ये या प्रक्रियेनंतर जवळपास 19 लाख लोकांची नावं वगळण्यात आली होती. अर्थात त्यांचं नागरिकत्व गेलं होतं. त्यावरून हा सगळा वाद निर्माण झाला. या कायद्याच्या विरोधात असलेल्या लोकांना वाटतं की CAA अमलात आल्यानंतर मुस्लिमांव्यतिरिक्त सर्व स्थलांतरित झालेल्या नागरिकांचा नागरिकत्वाचा मार्ग खुला झाला आहे. आणि NRC मध्ये भारताचा नागरिक कोण आहे निश्चित केलं जाणार आणि ज्या लोकांकडे जरूरी कागदपत्रे नसतील तर त्यांचं नागरिकत्व रद्द होणार.
CAA आणि NRC मुळे कोणते वाद झाले?
आता या सगळ्यात CAA मुळे काय होणार पहा. NRC कायद्यामुळे जे लोकांचे नागरिकत्व रद्द झाले अशा लोकांना CAA कायद्यामुळे नागरिकत्व भेटणार पण लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे नागरिकत्व फक्त गैरमुस्लिम लोकांनाच दिलं जाणार मग यातून मुस्लिम लोकांना नागरिकत्व भेटणार नाही आता हा झाला CAA NRC मुळे झालेला एक वाद. दुसरा वाद समजून घेण्यासाठी आसाम आंदोलन समजून घ्यायला हवं.
1979 ते 1985 या काळात आसाममधून ‘परदेशी’ लोकांना, विशेषतः बांगलादेशातून आलेल्यांना बाहेर काढा, या मागणीसाठी मोठं ‘आसाम आंदोलन’ झालं होतं आता यात परदेशी म्हणजे बांगलादेशातून आलेले लोक, मग ते हिंदू असो वा मुस्लीम. हे आंदोलन 1985 मध्ये केंद्र सरकार आणि आंदोलनाच्या नेत्यांमध्ये ‘आसाम करार’ झाल्यानंतरच संपलं. यात असं म्हटलं होतं की जे लोक 31 डिसेंबर 1965 पूर्वी आसाममध्ये आले होते, तेच आसामचे नागरिक असतील. 1966 ते 24 मार्च 1971 या काळात ज्यांनी आसाममध्ये प्रवेश केला, त्यांना “परदेशी” म्हणून स्वतःची नोंदणी करून घ्यावी लागेल. अशा लोकांना अवैध स्थलांतरित समजलं जाईल.याच आधारावर 2019 साली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आसाममध्ये NRC प्रक्रिया पार पडली.
हे NRC म्हणजे अशा लोकांची नोंदवही, ज्यांच्याकडे पुरावे आहेत की ते बांगलादेश स्वतंत्र होण्यापूर्वी, म्हणजेच 24 मार्च 1971 पूर्वी आसाममध्ये आले होते.आता आसामच्या लोकांना ही भीती आहे की जर गैर-मुस्लीम स्थलांतरित लोकांना CAAच्या माध्यमातून नागरिकत्व देण्यात आलं, तर त्यांची संख्या ही मूळ आसामी लोकांपेक्षा जास्त असेल यामुळे बांगलादेशच्या सीमेवरील ईशान्य भारतातील राज्यांना भीती वाटतेय की CAAमुळे आपल्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात सर्व धर्मांचे लोक स्थलांतरण करतील आणि त्यामुळे इथल्या संस्कृतीचं तसंच लोकसंख्येचं गणित बदलून जाईल.
इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना नागरिकत्व दिल्यावर त्यांना सुखसुविधा सुद्धा पुरवाव्या लागतील शिवाय या देशांमधून मोठ्या संख्येने लोक भारतात येत राहतील आणि ते देशात आल्यावर ते BJP ची व्होटबँक प्रमाणे राहतील शिवाय त्यांना रोजगार द्यायचं झालं तर भारतात आधीच इतकी बेरोजगारी असताना यात अजून भर पडेल यातून अनिष्ठ प्रकार घडत राहतील अशीही शंका उपस्थित केली जाते आणि यातून देशाच्या सुरक्षेबाबतीतही खुप तडजोड केली जाईल असंही काही लोकांना वाटतं.
By. UnCut मराठी Team