Ujjwal Nikam : लोकसभेची उमेदवारी आपल्यासाठी नवीन संधी, उज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया

Mumbai : भारतीय जनता पक्षाने (BJP) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी (Mumbai North Central) आपला उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी रविवारी, 28 एप्रिल रोजी मुंबईतील मुंबा देवी मंदिराला भेट दिली. आपण वकील म्हणून अनेक दशके देशासाठी काम करत आहोत, असे सांगून निकम यांनी आपली उमेदवारी ही नवी संधी असल्याचे सांगितले.


शनिवारी भाजपने आपली निवड जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी रविवारी मुंबा देवी मंदिरात प्रार्थना करून आपल्या दिवसाची सुरुवात केली. ते म्हणाले की मुंबा देवी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर, ते डॉ बी.आर.आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) स्मशानभूमी – चैत्यभूमीला भेट देणार आणि शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे आणि स्वातंत्रवीर सावरकर यांनाही विनम्र अभिवादन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“मी आजवर वकील म्हणून देशाची सेवा करत आलो आहे, आणि आता भाजपच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाने मला संसदेत जाऊन लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. मी आज येथे आलो कारण माझ्या राजकीय डावाची सुरुवात मला मुंबा देवीची पूजा करून करायची होती. माझ्या राजकीय डावाची सुरुवात करायची होती. यानंतर मी चैत्यभूमी (Chaitabhoomi), बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) यांच्या समाधीवर जाईन आणि त्यानंतर वीर सावरकरांना (Veer Savarkar) नमन करेन.

या भागातील समस्या समजून घेण्यासाठी आणि मुंबई शहराच्या भल्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे समजून घेण्यासाठी मी आमच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या बैठका घेईन,” असे वकील आणि मुंबई उत्तर मध्यचे भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांनी मुंबा देवी येथे प्रार्थना केल्यानंतर सांगितले. 

VIDEO | Lok Sabha Elections 2024: “I have been serving the country as a lawyer till date, and now BJP’s central and state leadership have given me the opportunity to go to the Parliament and serve the people. I came here today because I wanted to offer prayers to Mumba Devi… pic.twitter.com/YKEcgWzO4h

— Press Trust of India (@PTI_News) April 28, 2024

कोण आहेत उज्ज्वल निकम?

उज्ज्वल निकम हे मुंबई दहशतवादी हल्ला आणि 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात पोलिसांनी जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आली, तेव्हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शंभर आरोपींना दोषी ठरवण्यात आले तेव्हा निकम यांना ख्यातनाम वकिल असा दर्जा मिळाला.

मुंबई उत्तर मध्यमधून भाजपने काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निकम यांना उमेदवारी दिली आहे. गरीब आणि दुर्बलांसाठी कायदा हा महत्त्वाचा आधार असल्याचे निकम म्हणाले, “देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व अबाधित राहिले पाहिजे, असे मला वाटत असल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केला.”

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले (Vile Parle), चांदिवली (Chandivali), कुर्ला (Kurla), कलिना (Kalina), वांद्रे पूर्व (Bandra East) आणि वांद्रे पश्चिम (Bandra West) या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.

भाजपने दोन वेळच्या खासदार पूनम महाजन यांना डावलले

भाजपने दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना दोन वेळा खासदार झालेल्या मात्र यंदा त्यांना डावळण्यात आले. भाजपच्या युवा शाखेच्या माजी अध्यक्षा पूनम महाजन 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती असताना मुंबई उत्तर मध्यमधून निवडून आल्या होत्या. प्रमोद महाजन (हत्या) खटल्याच्या दिवसांपासून पूनम महाजन यांना ओळखत असल्याने त्यांच्याशी बोलणार असल्याचे निकम यांनी सांगितले.

By. Goutam Pradhan

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *