Ind Vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत (Ind Vs Eng ODI) भारतीय संघाने पहिल्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे, तर इंग्लंडला मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Ind Vs Eng 2nd ODI सामना कधी आणि कुठे होणार?
दिनांक : रविवार, 9 फेब्रुवारी
स्थळ : बाराबती स्टेडियम, कटक
सामन्याची वेळ : दुपारी 1:30 वाजता
टॉस : दुपारी 1:00 वाजता
Ind Vs Eng लाईव्ह सामना कुठे पाहता येईल?
टीव्ही : स्पोर्ट्स 18 नेटवर्क
ऑनलाइन स्ट्रीमिंग : डिज्नी प्लस हॉटस्टार अॅप
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह.
इंग्लंड संघ : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, गुस ऍटकिन्सन, मार्क वुड, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ.
Ind Vs Eng दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल!