Eknath Shinde

Eknath Shinde यांनी ठाकरेंचे आमदार फोडले? कोकणात धक्का देण्याच्या तयारीत!

Eknath Shinde : शिवसेना (Uddhav Thackeray) चे नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (Shivsena) प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संवाद साधला असून, पक्षप्रवेशाची तारीख 10 फेब्रुवारीऐवजी 13 फेब्रुवारी करण्याबाबत चर्चा केली आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

राजन साळवी हे कोकणातील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते मानले जातात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नाराजगीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी या अफवांना खोटे ठरवत, “मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार,” असे स्पष्ट केले होते.

Eknath Shinde धक्का देणार?

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या दोघांनीही ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे 15 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, या नेत्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. यामुळे ठाकरे गटाला कोकणात मोठे खिंडार पडणार असल्याचे दिसत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *