Delhi Election Results । नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निकालांमध्ये (Delhi Election Results) भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. हा काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षासाठी (AAP) सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपला (BJP) सत्ता खेचून आणण्यात यश आले आहे.
Delhi Election Results
या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला खातेही उघडता आले नाही. परंतु, आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव करण्यात मोठा हात आहे. जर या निवडणुकीमध्ये Delhi Election Results आप आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीच्या (INDIAlliance) माध्यमातून एकत्र निवडणूक लढले असते तर या पक्षांवर अशी वेळ आली नसती.
आप आणि काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात लढल्याने त्यांच्या मतांचे विभाजन झाले. आणि याच मतविभाजनाचा मोठा फायदा भाजपाला झाला. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासमोर भाजपाचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचं आव्हान होतं. केजरीवाल यांचा ४ हजार ८९ मतांनी पराभव झाला तर दीक्षित यांना ४ हजार ५६८ मते पडली.
तसेच दुर्गेश पाठक यांना भाजपच्या उमंग बजाज यांच्याकडून १२३१ मतांनी पराभव झाला. येथे काँग्रेसला ४ हजार १५ मते पडली. सौरभ भारद्वाज यांना भाजपाच्या शीखा रॉय यांच्याकडून ३ हजार १८८ मतांनी पराभव पत्करावा लागला. येथे काँग्रेसला ६ हजार ७११ मते पडली.
मनीष सिसोदिया यांना भाजपाच्या तरविंदर सिंह मारवाह यांच्याकडून ६७५ मतांनी पराभव झाला. पण काँग्रेसचे उमेदवार फरहाद सुरी यांना ७ हजार ३५० मते मिळाली. सोमनाथ भारती यांना भाजपाच्या सतीष उपाध्याय यांच्याकडून २ हजार १३१ मतांनी पराभव झाला. येथे काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र कुमार कोचर यांना तब्बल ६ हजार ७७० मते मिळाली.