आनंद महिन्द्रांनी सरफराज खान च्या वडिलांना गिफ्ट केली “थार”

आनंद महिन्द्रांनी सरफराज खान च्या वडिलांना गिफ्ट केली “थार”

Anand Mahindra Gifted Thar : सरफराज खान (Sarfaraj Khan)आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) ही नावे भारतीय क्रिकेटच्या (Indian Cricket) जगतात गाजत आहेत, कारण राजकोट (Rajkot) येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी (Ind Vs Eng Third Test) दोघे पण भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket Team) पदार्पण (Debut) करणारे खेळाडू बनले आहेत.

मुंबईचा प्रतिभावान क्रिकेटपटू सरफराज खान ने दर्जेदार इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी (Ind Vs Eng Third Test Day 3) मैदानात पदार्पणातच केलेल्या शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, केवळ त्याच्या मैदानावरील कामगिरीने लोकांचे लक्ष वेधून घेतले नाही, तर त्याने आणि त्याचे वडील नौशाद खान (Naushad Khan) यांच्या भावनिक करणाऱ्या क्षणांमुळे सुद्धा लोकांचे लक्ष वेधून घेतले.

सरफराज खानचा भारतीय कसोटी कॅप मिळवण्यापर्यंतचा प्रवास हा त्याच्या अतूट समर्पणाचा आणि त्याच्या कुटुंबाच्या अतूट पाठिंब्याचा पुरावा होता. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच, त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले, हे स्वप्न अखेरीस इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी त्याच्या निवडीमुळे पूर्ण झाले. त्याचे वडील, नौशाद, जे नेहमी त्यांच्या पाठीशी होते, त्यांना त्यांच्या मुलाला हा टप्पा गाठताना पाहून आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

खान कुटुंबाच्या चिकाटीची हृदयस्पर्शी कथा प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे (Mahindra Group) अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या मनाला भावली. त्यांच्या प्रेरणादायी कथेने प्रभावित होऊन, आनंद महिंद्रांनी त्यांचे कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर नौशाद खान यांना महिंद्रा थारची (Mahindra Thar) ऑफर दिली.

“”हिम्मत नको सोडूस, बस!”… मेहनत, धैर्य, संयम, मुलामध्ये प्रेरणा देण्यासाठी वडिलांसाठी यापेक्षा चांगले गुण कोणते आहेत? नौशाद खान यांनी जर माझी थारची भेट स्विकारली तर हा माझा बहुमान आणि सन्मान असेल. थारची भेट स्वीकारा,”

“Himmat nahin chodna, bas!”

Hard work. Courage. Patience.

What better qualities than those for a father to inspire in a child?

For being an inspirational parent, it would be my privilege & honour if Naushad Khan would accept the gift of a Thar. pic.twitter.com/fnWkoJD6Dp

— anand mahindra (@anandmahindra) February 16, 2024

By. Goutam Pradhan 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *