Sharad Mohol Murder । पुणे विद्येचं माहेरघर की गुन्हेगारीचं?

Sharad Mohol Murder : एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी घटनांसाठी चर्चेत आहे. पुणे शहर (Pune City) आणि परिसरात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय आणि यामध्ये तरूण मुलांचा सहभाग असल्याचं दिसतो. सध्या शरद मोहोळ हत्याकांड(Sharad Mohol Murder Case) पुण्यातील गुन्हेगारी विश्वात सगळ्यात जास्त चर्चेत आहे. पण पुण्यात गुन्हेगारी आत्ताच अस्तित्वात आली का तर अजिबात नाही. गेली कित्येक वर्ष पुणे शहर आणि परिसरातील भाग गुन्ह्यांमध्ये टॉप वर आहे. मग ती कोयता गँग असू नाहीतर शरद मोहोळ गँग. या सगळ्या गोष्टींमुळे पुणे खरच विद्येचे माहेरघर आहे का गुन्हेगारीचे असा प्रश्न निर्माण झालाय.

आपल्या अनकट मराठी च्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

पुण्यातील गुन्हेगारी काही नवीन नाही. पुण्यात गुन्हेगारीचा खूप जुना इतिहास आहे. अनेक डॉन, गुंड, गुन्हेगार इथे जन्माला आले आणि हिंसा करता करताच गेले. पण या सगळ्यातून एकेकाळी स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे पुणे शहर मात्र आपली ओळख गुन्हेगारी विश्व म्हणून समोर येतंय एवढ नक्की. 

कसा मारला गेला शरद मोहोळ?

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्यावर 5 जानेवारीला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 जणांनी गोळीबार केला आणि त्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला. कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराच्या घटनेनंतर गंभीररित्या जखमी झालेल्या शरद मोहोळला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तिथे उपचार करताना त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळच्या लग्नाचा 5 जानेवारीला वाढदिवस होता. त्यासाठी दोघे पती-पत्नी गणपतीच्या दर्शनाला जायला निघाले होते त्यावेळी त्याच्यावर गोळीबार झाला. 40 वर्षीय शरद हिरामण मोहोळ हा पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर दिवसाउजेडी गोळीबार आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानं या भागात खळबळ उडाली.

गुन्हेगारी विश्वात खूप मोठे नाव!

शरद मोहोळ हा सुमारे 15 गंभीर गुन्ह्यांमध्ये अट्टल दहशतवादी गुंड म्हणून ओळखला जातो. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव (Alok Bhalerao) यांच्यावर जून 2012 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी (Katil Siddiqui) याचा येरवडा तुरुंगात पायजम्याच्या नाड्याने गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कारण काय तर सिद्दीकी ने त्याच्याकडे रागाने पाहिले म्हणून सरळ खून. पण पुराव्यांअभावी मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी 2010 मध्ये गुंड किशोर मारणेच्या (Kishor Marne) हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 2021 मध्ये पुराव्यांअभावी उच्च न्यायालयाने (High Court) त्यांना जामीन मंजूर केला. आणि विशेष म्हणजे त्याच्या पत्नीने भारतीय जनता पक्षात (BJP) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. पण इथे प्रश्न निर्माण होतो की असे गुंड युवकांचे तरुण मुलांचे आदर्श कसे असू शकतात?

पुणे विद्येचं माहेरघर की गुन्हेगारीचं?

मध्यंतरी पुण्यातील सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) एक मुलगी कोयता हल्ल्यातून ज्या पद्धतीने वाचली तो थरार सर्वांनी पाहिला आहे. समाजातील विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया आल्या. राजकारणही करण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे होतच राहणार. पण खरा प्रश्‍न आहे तो अशा घटनांच्या मुळापर्यंत जाऊन आपण कधी विचार करणार हा. एखादी घटना झाली, दोन-चार दिवस त्यावर चर्चा होणार आणि तशीच घटना भविष्यात होईपर्यंत आपण गप्प बसणार, ही वृत्ती बळावत आहे. पण नेमके कोणाचे चुकते? यावर आता गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरुण मुलांसाठी असे लोक हिंदूंयोद्धे, असतात नाहीतर आदर्श, हल्लीच्या धावत्या युगात स्वतःच एक वेगळ विश्व नाहीतर दरारा निर्माण करण्याची स्पर्धाच जणू लागलीय. पालकांची, पोलिसांची अन् समाजाची जबाबदारी काय आहे, हे निश्‍चित करण्याची वेळ आता आलीये. तरुण एवढे टोकाची भूमिका का घेऊ लागले आहेत?, यात चूक कोणाची?, यावर मार्ग काढणे शक्य आहे का?, यावर विचारमंथन व्हायला हवे. आपल्या मुलांवर आपले प्रेम आणि विश्‍वास असतोच. तो असायला काही हरकत नाही. पण, आपले मूल आपल्या प्रेमाचा व विश्‍वासाचा गैरफायदा घेत नाही ना, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. प्रसंग ओढवल्यानंतर इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही. तरुणांनीही रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलून नंतर पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नाही.

असो पुणे अजूनही सांस्कृतिक किंवा सुसंस्कृत शहर राहिले आहे का? यावर तुम्हाला काय वाटत ते आम्हाला खाली कमेन्ट बॉक्स (Comment Box) मध्ये नक्की सांगा. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *