शोएब मलिकच्या बहिनीने केला खुलासा ; करायचा अस कृत्य, ज्यामुळे सानिया ने मोडला संसार

Saniya Mirza And Shoaib Malik Divorce : पाकिस्तान चा पुर्व क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) ने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) सोबत लग्नाची घोषणा केली आणि त्यासोबतच पुर्व भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा शी (Saniya Mirza) घटस्फोटाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. शोएब मलिक ने आपल्या इंन्स्टाग्रामवर आपल्या लग्नाचे फोटो शेयर केले. परंतु द पाकिस्तानी डेली (The Pakistani Daily) च्या एका रिपोर्ट मध्ये एक खुलासा केला गेलाय. रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय, लग्नात शोएबच्या परिवारातील कोणतेच सदस्य सहभागी झाले नाहीत. दुसरीकडे, सानिया मिर्झा ने शोएब पासून वेगळं होण्याचा निर्णय का घेतला, त्याचे कारण आता समोर आलंय.

सानिया मिर्झा च्या वडिलांनी शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या लग्नाविषयी शोएब मलिक ला स्वतंत्र असल्याचं म्हटलं होतं. याचा अर्थ असा होतो कि, एक पत्नी विनापरवानगी आपल्या पतीपासून घटस्फोट घेऊ शकते. रिपोर्ट मध्ये अस पण म्हटलं गेलय की सानिया मिर्जा, शोएब मलिकच्या Extra Marital Affairs ला कंटाळली होती. खुलासा शोएब मलिकच्या बहिनींनी केलाय. खूप दिवसांपासून दोघे वेगळे होणार असल्याच्या बातम्या येत होत्या परंतु दोघांनी पण या बातम्यांवर बोलणं टाळलं होते. पण आता शोएब मलिकच्या दुसर्या लग्नाने सानिया मिर्जा आणि शोएब मालिक वेगळे झाले यावर शिक्कामोर्तब झाले.  

हे ही वाचा : 10 Essential Tips  : लक्षद्वीप (Lakshadweep) ला जाताय? मग या दहा गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

शोएब मलिकचे ही तीसरे लग्न आहे, सानिया सोबतच्या लग्नाआधी त्याने आयशा सिद्दिकी सोबत निकाह केला होता.  शोएब आणि सानिया यांनी एप्रिल २०१० मध्ये हैदराबाद येथे लग्न केले होते आणि ते दुबई ला राहत होते. २०१८ मध्ये दोघांना एक मुलगा झाला ज्याचे नाव इजहान आहे आणि तो आता ५ वर्षांचा आहे, तो आता सानियासोबत राहतो. शोएब ने ज्यावेळी सनासोबत लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले त्यानंतर लगेचच सानिया ने घटस्फोटाच्या कारवाई ला सुरुवात केली. शोएब ची नवी पार्टनर पाकिस्तान च्या टीव्ही सीरीअल आणि सिनेमांमध्ये काम करत आहे. सना सुद्धा घटस्फोटित आहे तिने सिंगर उमैर जाइसवाल सोबत २०२० मध्ये लग्न केले होते मात्र लग्नाच्या दोन महिन्यांमध्येच त्यांचा घटस्फोट झाला होता. 

आपल्या UnCut मराठी च्या यूट्यूब चॅनल ला Subscribe करा. तसेच आमच्या सोशल मीडिया अकाऊंट ला फॉलो करा.




Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *