लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी तेजस्वी यादव यांच्या अडचणी वाढल्या

Land For Jobs Scam : लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी आज (30 जानेवारी) केंद्रीय तपास यंत्रणा (ED) बिहारचे (Bihar) माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची चौकशी करणार आहे. रविवारी राजदप्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) तब्बल 9 तास चौकशी केली होती.

Tejashwi Yadav

राजद (RJD) चे खासदार आणि त्यांची मुलगी मीसा भारती (Misa Bharati) राजद प्रमुखांसोबत च्या चौकशीदरम्यान उपस्थित होत्या. लालू यादव सोमवारी 11 वाजून ०५ मिनिटांनी ईडी कार्यालयात पोहोचले. तब्बल नऊ तास चाललेल्या चौकशीनंतर ते रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी आपल्या निवासस्थानी रवाना झाले.

या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत लालूप्रसाद यादव यांचा जबाब नोंदवला आहे. सूत्रांनी सांगितले की, कथित घोटाळ्यासंदर्भात राजद नेत्याची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक रविवारी पाटण्यात पोहोचलेआहे.

जनता दल युनायटेडचे (JDU) अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर लालूप्रसाद यादव केंद्रीय एजन्सीसमोर हजर झाले. राजद  कडून मात्र या चौकशीला मोठे राजकीय षडयंत्र म्हटले जात आहे.

#WATCH | Patna: Visuals from outside the residence of former Bihar Deputy CM and RJD leader Tejashwi Yadav

He has been summoned by ED today over the land for jobs scam case pic.twitter.com/jUt1Q5QybL

— ANI (@ANI) January 30, 2024

काय म्हणाल्या मीसा भारती?

ईडीने लालूप्रसाद यादव यांच्या चौकशीवर त्यांची मुलगी मीसा भारती म्हणाल्या, ‘सोमवारी आमचे वडील लालूप्रसाद यादव यांना बोलावण्यात आले आणि एका दिवसानंतर आमचे बंधू तेजस्वी यादव यांना बोलावण्यात आले. यासोबतच आम्हाला दिल्लीलाही बोलावण्यात आले आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे आपले पंतप्रधान (Prime Minister Narendra Modi) खूप घाबरलेले दिसत आहेत. आज हे आमच्याबाबतीत घडले आणि उद्या दुसर्या कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या बाबतीत घडेल. हे सरकार आम्हाला अटकही करू शकतं.

By. UnCut मराठी Team

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *