“फाइटर” च्या कमाईचे आकडे वाढले, महेश बाबू च्या “गुंतूर कारम” ने केले निराश तर “हनुमान” अजूनही जोमात

Box Office Collection : सिद्धार्थ आनंद (Box Office) दिग्दर्शित एरियल ॲक्शन फिल्म ‘फायटर’ (Figher Movie) 25 जानेवारीला रिलीज झाला. दीपिका पादुकोण (Dipika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनीत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 22.50 कोटींची ओपनिंग घेतली. पहिल्या दिवसाची कमाई पाहून सिनेपंडितांसह अनेकांना धक्का बसला. मात्र, चित्रपटाची दुसऱ्या दिवसाची कमाई उल्लेखनीय आहे.


Box Office

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचले. याचा परिणाम असा झाला की, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी (Fighter Day 2 Box Office Collection) 39 कोटींचा व्यवसाय केला. अशाप्रकारे चित्रपटाचे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 61.5 कोटी रुपये झाले आहे.

प्रशांत वर्मा (Prashant Verma) दिग्दर्शित, तेजा सज्जा आणि अमृता अय्यर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘हनुमान’ (Hanuman Movie) चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली आहे. कमी बजेटचा हा चित्रपट रिलीजच्या अवघ्या 14 दिवसांत (Hanuman Day 14 Box Office Collection) 150 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. त्याचबरोबर ‘फायटर’ रिलीज झाल्यानंतरही ‘हनुमान’ प्रेक्षक जमवण्यात यशस्वी होताना दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या 15 व्या दिवशी (Day 15) या चित्रपटाने 8.50 कोटींची कमाई केली. आता ‘हनुमान’चे एकूण कलेक्शन 158.90 (Hanuman Box Office Collection) कोटी रुपये आहे.


महेश बाबू (Mahesh Babu) स्टारर ‘गुंटूर करम’ (Guntur Kaaram) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित रिलीजपैकी एक आहे. मात्र, रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांना अपेक्षित प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला नाही. त्रिविक्रम श्रीनिवास (Trivikram Srinivas) दिग्दर्शित या चित्रपटाने सुरुवातीच्या काळात चांगली कामगिरी केली होती. आता हा चित्रपट कमाईचा ट्रॅक रुळावरून घसरताना दिसत आहे. ‘गुंटूर करम’ने 15 व्या दिवशी (Guntur Kaaram Box Office Collection) 66 लाखांची कमाई केली असून, त्याचा एकूण व्यवसाय 121.52 कोटींवर पोहोचला आहे.


अभिनेता पंकज त्रिपाठीचा (Pankaj Tripathi)  ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाची कथा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जीवनावर आधारित आहे. पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. यात एकता कौल, पियुष मिश्रा, पायल नायर, दया शंकर पांडे, प्रमोद पाठक आणि पॉला मॅकग्लिन यांच्याही भूमिका आहेत. रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. रिलीजच्या आठव्या दिवशी या चित्रपटाने 62 लाखांची कमाई केली आणि एकूण व्यवसाय 8.62 कोटींवर नेला.

By. Trupti S.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *