Sandip Lamichhane News : नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला शुक्रवारी काठमांडू येथील न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला, काठमांडूमधील एका हॉटेलच्या खोलीत या क्रिकेटपटूने तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा करत 17 वर्षांच्या मुलीच्या आरोपावरून अटक केल्यानंतर न्यायालयाने लामिछानेची जामिनावर सुटका केली होती.
23 वर्षीय लामिछाने नेपाळचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू म्हणून जगासमोर आला आहे आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळणारा तो नेपाल देशातील पहिला खेळाडू आहे. लामिछानेने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स या फ्रँचायझीसह आयपीएलमध्ये पदार्पण केले.
काठमांडू पोस्टच्या अधिकृत माहितीनुसार, गेल्या रविवारी सुरू झालेल्या अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, संयुक्त खंडपीठाच्या अध्यक्षतेखाली न्यायाधीश शिशिर राज ढकल यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
काठमांडू जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी लामिछाने याला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवले. पुढील सुनावणीत राष्ट्रीय संघातील वरिष्ठ सदस्याला तुरुंगवासाची शिक्षा निश्चित केली जाईल, असे कोर्टाच्या अहवालात म्हटले आहे.
संदीप लामिछाने सध्या जामिनावर बाहेर आहे. 12 जानेवारी रोजी पाटण उच्च न्यायालयाने क्रिकेटपटूच्या सुटकेचे आदेश दिले होते. लामिछाने याने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेला उत्तर देताना न्यायमूर्ती ध्रुवराज नंदा आणि रमेश दहल यांच्या संयुक्त खंडपीठाने लामिछाने याची २० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटींसह सुटका करण्याचे आदेश दिले.
Sandeep Lamichhane convicted of rape
The next hearing will determine the jail term for the cricketer.https://t.co/Wq6kyvfG1o
— The Kathmandu Post (@kathmandupost) December 29, 2023
काठमांडू जिल्हा न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी अटकेवरील सुनावणीनंतर लामिछाने यांना सुंधरा येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला लामिछाने याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. काठमांडू जिल्हा मुखत्यार कार्यालयाने 21 ऑगस्ट रोजी लामिछाने याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. या अल्पवयीन मुलीने 6 सप्टेंबर रोजी महानगर पोलीस सर्कल, गोशाळेत या क्रिकेटपटूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
हे ही वाचा : SBI Clerk Prelims Admit Card 2023 । एसबीआई क्लर्क पदाच्या पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जारी.
नेपाळ पोलिसांनी त्याला 6 ऑक्टोबर रोजी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्रिनिदाद आणि टोबॅगो येथून परतल्यावर अटक केली जिथे तो कॅरेबियन प्रीमियर लीग खेळला होता.
आरोपपत्राद्वारे जिल्हा वकिलांनी पीडितेच्या कथित शारीरिक व मानसिक छळासाठी लामिछाने याच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर लामिछाने याचे बँक खाते आणि मालमत्ता गोठवण्यात आली.
तो ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (BBL), पाकिस्तान सुपर लीग (PSL) आणि जगभरातील इतर मोठ्या टी-20 लीगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू होता. विलक्षण प्रतिभाशाली असलेल्या या क्रिकेटपटूच्या नावावर ५० एकदिवसीय विकेट्स घेण्याचा जगातील दुसरा-सर्वात वेगवान गोलंदाजाचा विक्रम आहे आणि ५० T20I विकेट्स घेण्याच्या शर्यतीत तिसऱ्या-जलद गोलंदाजाचा विक्रम केला आहे. लामिछाने या वर्षी ऑगस्टमध्ये केनियाविरुद्ध T20I सामन्यामध्ये खेळताना शेवटचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला होता.